रामराजे शिंदे, नवी दिल्ली : धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात रेमडिसीवर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाय योजना करावी यासाठी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉ. व्ही. जी. सोमानी यांची दिल्लीत भेट घेतली.
या संदर्भात सर्व कंपन्याशी केंद्रीय मंत्र्यांनी निर्देश दिले असून येत्या ३ ते ४ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात रेमडीसिवीर इंजेक्शन चा पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी डॉ. सुभाष भामरे यांना दिले.
राज्यात रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन अभावी रुग्णांवर उपचारात अडचणी येत आहेत. रेमडीसीवीर इजेक्शनचाही तुडवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
औषध आणि ऑक्सीजन अशा दोन्हींच्या टंचाईचा महाराष्ट्रातील आरोग्य सेवेवर ताण निर्माण झाला असल्याने कंपन्यांशी चर्चा करून तातडीने रेनडीसिवीर औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार सुभाष भामरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉ. व्ही. जी. सोमानी यांची भेट घेऊन केली. त्यानुसार डॉ. हर्षवर्धन यांनी येत्या ३ दिवसात रेमडेसिवर औषधे पुरवण्याचे आश्वासन दिले.