मुंबईत शिवसेनेच्या खेळीने काँग्रेस घायाळ, वादाचा परिणाम थेट महाविकास आघाडीवर?

महापालिकेच्या वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडत प्रक्रियेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षात जुंपलीय. 

Updated: Jun 1, 2022, 10:13 PM IST
मुंबईत शिवसेनेच्या खेळीने काँग्रेस घायाळ, वादाचा परिणाम थेट महाविकास आघाडीवर? title=

कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई :  महापालिकेच्या वॉर्ड पुनर्रचना (BMC ward restructuring) आणि आरक्षण सोडत प्रक्रियेवरून महाविकास आघाडीतील (Mahavikas aaghadi ) शिवसेना (Shivsena ) आणि काँग्रेस ( Congress ) या दोन पक्षात जुंपलीय. नगरविकास खात्याच्या निर्देशावरुनच प्रशासनानं मुंबईतील वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षणात फेरफार केल्याचा थेट आरोप काँग्रेसनं केलाय. शिवसेनेने सत्तेचा वापर करून आपल्याला सोयीची वॉर्ड पुनर्रचना केल्याचा आरोप काँग्रेसने यापूर्वीच केला होता. त्यानंतर आरक्षण सोडतीवरूनही तोफ डागत थेट सुप्रीम कोर्टात ( Supreme Court ) दाद मागणार असल्याचा इशारा दिलाय

मुंबई महापालिकेची निवडणूक जरी पावसाळ्यानंतर होण्याची अधिकतर शक्यता असली तरी निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रियेला सुरूवात केलीय (BMC elections 2022 ) . मुंबईत काॅग्रेसच्या २९ नगरसेवकांपैकी २१ नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण सोडतीत खालसा झाल्याने काँग्रेेसमध्ये नाराजी पसरलीय.मुंबईत वॉर्ड आरक्षण सोडतीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसलाय.माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा , आसिफ झकेरिया, सुफियान वनु , कमरजहाॅ सिद्दीकी,बब्बू खान या काही महत्वाच्या काँग्रेस नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झालेत. वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेनं स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केले आहे. मुंबईत शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण केले जात असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.  

रवी राजा ( ravi raja ) यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनीही यावरून नाराजी व्यक्त केली. यावर येत्या आठवड्यात मुंबईत चिंतन शिबीर (Congress Chintan Shivir )घेऊन मुंबईतील काँग्रेस नेते चर्चा करणारेत. महाविकास आघाडीत सहभागी या दोन पक्षांमध्ये मुंबई महापालिका निवडणूक रणांगणात येत्या काळात आणखी तीव्र लढाई होण्याची शक्यता आहे. सध्या तरी शिवसेनेच्या खेळीनं काँग्रेस घायाळ झालीय,एवढं मात्र खरं.

restructuring of BMC wards congress angry on shiv sena plans to tap SC doors