Video | रस्त्यावरील 'रक्ताच्या' पाण्यामुळं राज्यातील 'या' भागात एकच खळबळ

मालेगावमधील मोसम नदीपात्रात रक्तमिश्रित पाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होतंय.. कत्तलखान्याचे रक्त मिश्रित पाणी थेट ड्रेनेजद्वारे मोसम नदी पत्रात सोडले जाते.

Updated: Jun 27, 2022, 08:47 AM IST
Video | रस्त्यावरील 'रक्ताच्या' पाण्यामुळं राज्यातील 'या' भागात एकच खळबळ title=

मुंबई : मालेगावमधील मोसम नदीपात्रात रक्तमिश्रित पाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होतंय.. कत्तलखान्याचे रक्त मिश्रित पाणी थेट ड्रेनेजद्वारे मोसम नदी पत्रात सोडले जाते.

मालेगाव शहरातील रस्ते अचानक रक्तमिश्रित पाण्याने दुषित झाले असून यामुळे महापालिकेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील कत्तलखान्यांमधून जनावरांचे रक्तमिश्रित पाणी थेट ड्रेनेजने मोसम नदीत सोडले जात आहे. 

या ड्रेनेजमध्ये घाण साचल्यानं पाणी थेट सांडवा पूलावर आल्याने व्यावसायिकांची चांगलीच अडचण निर्माण झाली.  वारंवार तक्रार करुनही महापालिका दुर्लक्ष करतंय. याबाबत मालेगावकरांनी संताप व्यक्त केला आहे.