जयंतराव पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणतात...

आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया

Updated: Jan 21, 2021, 06:44 PM IST
जयंतराव पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणतात...

सोलापूर : 'जयंतराव पाटील यांचं त्यांच्या मतदारसंघात आणि राज्यात मोठं काम आहे. आपल्या हातून लोकांची सेवा घडावी म्हणून त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं असावं, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. सोलापूर दौऱ्यात रोहीत पवारांनी हे वक्तव्य केलं. मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, आपलंही स्वप्न असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले होते. त्यावरुन प्रतिक्रीया उमटत आहेत.

गेली 20 वर्षे राजकारणात सक्रीय सहभाग असल्याने मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नसल्याचं त्यांनी सांगितंलं. तर जयंत पाटलांच्या इच्छेला आपला पाठिंबा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. मात्र जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय विश्वात चघळायला आणकी एक आयता विषय मिळालाय. दरम्यान आपलं वक्तव्य मोडतोड करून दाखवल्याचा दावा जयंत पाटलांनी केला आहे. मुख्यमंत्री व्हायला आवडेल का या प्रश्नावर आमचं संख्याबळ कमी आहे. आम्ही मुख्यमंत्री कसे होणार असं म्हटल्यांचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात ही चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्रीपद मिळावं ही पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा असते. माझ्यासोबत मतदारांना देखील आपण मुख्यमंत्री बनावं, अशी इच्छा असेल. असं त्यांनी म्हटलं होतं.