महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिसरी आघाडी म्हणजे... रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics : शरद पवारांकडून कौतुक झाल्यानं नवी ऊर्जा मिळाल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. रोहित पवारांना येत्या दोन महिन्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यामुळं रोहित पवारांना कोणती मोठी राजकीय जबाबदारी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. टू द पॉईंट या मुलाखतीत रोहित पवारांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिलीय.

वनिता कांबळे | Updated: Oct 5, 2024, 10:03 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिसरी आघाडी म्हणजे... रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar To The Point With Kamlesh Sutar : तिसरी आघाडी म्हणजे भाजपने पुढे केलेली टीम तर नाही ना अशी शंका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपस्थित केलीय. मतविभाजन करण्यासाठीच तिसरी आघाडी उघडल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय. झी २४ तासच्या टू द पॉईंट (To The Point With Kamlesh Sutar) मुलाखतीत रोहित पवारांनी हे विधान केलंय. महायुती आणि महाविकास आघाडीला सक्षम पर्याय म्हणून संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. याच तिस-या आघाडीवर रोहित पवारांनी आपली शंका बोलून दाखवली आहे.

Add Zee News as a Preferred Source

हे देखील वाचा... महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जगांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले...

महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंची वाढलेली ताकद भाजपला आवडलेली नाही.. अशा खळबळजनक दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. त्याचसोबत शरद पवारांची ताकद कमी करण्यासाठी कुटुंब फोडलं असा मोठा आरोपही रोहित पवारांनी केलाय.. मात्र लोकं ही शरद पवारांची ताकद आहेत असा इशारा रोहित पवारांनी सत्ताधा-यांना दिलाय..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान

दुसऱ्यांना झुंजवण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून लढावं असं आव्हान रोहित पवारांनी दिलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिलंय. जामखेडमधून अजित पवार निवडणूक लढणार का या प्रश्नावर बोलताना त्यांनी फडणवीसांवर टीका केलीय. कर्जत जामखेड हा मतदारसंघ महायुतीत भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळं अजित पवारांना जामखेडमधून उतरवण्यापेक्षा फडणवीसांनी जामखेड लढवावं असं रोहित पवार म्हणालेत.
जयंत पाटलांशी कोणतेही मोठे मतभेद नसल्याचं स्पष्टीकरण आमदार रोहित पवारांनी दिलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. दोघांमध्ये मोठे मतभेद नाहीत पण विरोधक या मतभेदांना संघर्षाचं स्वरुप देत असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांचे जयंत पाटलांसोबत तीव्र मतभेद असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

शरद पवारांचा यंदा 85 वा वाढदिवस आहे... आणि त्यांच्या 85 व्या वाढदिवसाला 85 जागा निवडून याव्यात ही कार्यकर्त्यांची भावनिक इच्छा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय... येत्या 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस आहे.. तेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा रोहित पवारांनी टू द पॉईंट जाहीरपणे बोलून दाखवलीय.. यंदा तुतारी जबरदस्त वाजणार असा विश्वासही रोहित पवारांनी बोलून दाखवलाय...

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More