संघाला हे दिवस येतील असे कोणालाही वाटले नव्हते - मोहन भागवत

पुण्यात गीतादर्शन मासिकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात मंगळवारी झाली.

Updated: Dec 19, 2018, 10:09 AM IST
संघाला हे दिवस येतील असे कोणालाही वाटले नव्हते - मोहन भागवत

पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे दिवस येतील, असे कधी वाटले नव्हते. पण आपण सगळ्यांनी चांगले प्रयत्न केल्यामुळे हे दिवस पाहायला मिळाले, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात म्हटले.

पुण्यात गीतादर्शन मासिकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात मंगळवारी झाली. या कार्यक्रमाला मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी संघाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल मार्मिक टिप्पणी केली. आम्हाला कायम नावे ठेवली गेली. एखादा चांगला शब्द ऐकला तरी आम्हाला चुकल्या चुकल्यासारखे वाटायचे. पण सगळ्यांनी प्रयत्न चांगले केले. प्रयत्न निर्दोषपणे आणि पूर्ण चिकाटीने केल्यामुळे आम्हाला हे दिवस पाहायला मिळाले आहेत, असे त्यांनी म्हटले.