नागपुरात दहशत पसरविणाऱ्या गुंडांची शहरात धिंड

नागपूर येथे शस्त्रांच्या जोरावर दहशत पसरविणाऱ्या गुंडांची पोलिसांनी नागरिकांसमोरच धिंड काढली. 

Updated: Jul 18, 2019, 10:02 AM IST
नागपुरात दहशत पसरविणाऱ्या गुंडांची शहरात धिंड

नागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवरील सेवासदन चौक संत्रा मार्केट इथे शस्त्रांच्या जोरावर दहशत पसरविणाऱ्या गुंडांची पोलिसांनी नागरिकांसमोरच धिंड काढली. पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत निर्भयपणे या गुन्हेगारांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. शहराताल भयमुक्त करण्यासाठी पोलिसांनी उचलेल्या या पाऊलामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

१६ जुलैला गणेशपेठ पोलीस स्टेशनअंतर्गत रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस व सेवासदन चौकात गुंडांनी एका हॉटेलमध्ये  आणि त्यानंतर बाहेर रस्त्यावर १५ ते २० गाड्यांची तोडफोड केली होती. तोडफोड करणाऱ्या  गुंड फैजान खान व त्याचा साथीदार अजय ठाकूर याला पोलिसांनी अटक केली. 

या अटकेनंतर या परिसरातील लोकांमध्ये या गुंडांची दहशत कमी करण्यासाठी अटकेतील गुंडांची पायी परेड काढली. आणि लोकांना भर रस्त्यात पोलिसांच्या अटकेत असलेले गुंड दाखवत बिनधास्त समोर येऊन लोकांनी तक्रार द्याव्या, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले.