EXCLUSIVE : बैलपोळ्यानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून बैलांची पूजा

सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासह दोन दिवसांच्या ताडोबा सफरीवर आला होता

Updated: Sep 6, 2021, 10:54 PM IST
EXCLUSIVE : बैलपोळ्यानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून बैलांची पूजा title=

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये ताडोबा सफरीवर असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने पोळ्यानिमित्त बैलांची पूजा केली. ताडोबा सफारी साठी चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या सचिन तेंडुलकरने आज संध्याकाळी मुक्कामी असलेल्या रिसॉर्टमध्ये बैलांची पूजा करून शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. 

सचिनच्या रिसॉर्ट जवळ असलेल्या तुकूम या गावातील 2 शेतकरी तेजराम खिरडकर आणि विनोद निखाडे आपली बैलजोडी घेऊन रिसॉर्ट मध्ये आले होते. यावेळी सचिन तेंडुलकरने बैलांची पूजा केली आणि शेतकऱ्यांना टॉवेल आणि पैसे देऊन त्यांचा सन्मान केला.

सचिन तेंडुलकर ताडोबा सफरीवर

ताडोबातील व्याघ्रदर्शनाच्या ओढीने सचिन तेंडुलकर कुटुंबासह शनिवारी सकाळी नागपुरात दाखल झाला. शनिवारी सकाळी सचिन, त्याची पत्नी अंजली, भाऊ आणि वहिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने सचिनने ताडोबातील वाघाच्या दर्शनाची चित्रफीतही आपल्या फेसबुक पेजवर टाकली होती. ताडोबात सचिन दोन दिवस मुक्कामी होता. याआधी 24 ते 27 जानेवारी दरम्यान चार दिवस सचिन तेंडुलकर ताडोबात मुक्कामी होता. यादरम्यानचा घेतलेल्या अनुभवाचा व्हिडिओ त्याने चाहत्यांसोबत शेअर केला होता.