समृद्धी महामार्गाच्या नावानं शिवडे ग्रामस्थांचा 'शिमगा'

शिवडे ग्रामस्थांनी आज होळीच्या दिवशी समृद्धी महामार्गाच्या नावानं 'शिमगा' केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाला शिवडे गावकऱ्यांचा विरोध आहे. शिमग्याच्या माध्यमातून त्यांनी ही विरोधाची परंपरा कायम ठेवली. 

Updated: Mar 2, 2018, 10:54 PM IST
समृद्धी महामार्गाच्या नावानं शिवडे ग्रामस्थांचा 'शिमगा' title=

नाशिक : शिवडे ग्रामस्थांनी आज होळीच्या दिवशी समृद्धी महामार्गाच्या नावानं 'शिमगा' केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाला शिवडे गावकऱ्यांचा विरोध आहे. शिमग्याच्या माध्यमातून त्यांनी ही विरोधाची परंपरा कायम ठेवली. 

योग्य मोबदला नसल्याने विरोध

बागायती जमिनींना योग्य मोबदला मिळत नसल्यानं शिवडेकर या प्रकल्पाला विरोध करतायत. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडंच या गावक-यांची भेट घेऊन त्यांच्या विरोधामागची भूमिका समजावून घेतली. मात्र त्यानंतरही शिवडेकरांचा विरोध कायम आहे.

शेतकऱ्यांची मागण्यांकडे दुर्लक्ष

बागायती जमीन प्रकल्पात जात असल्यानं तसेच मनासारखा मोबादला मिळत नसल्यामुळे शिवडेतील शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध कायम आहे.MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट घेतली होती. यावेळी शिवडेतील शेतकऱ्यांच्या विरोधामागची भूमिका जाणून घेतली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी मोबदल्यासंदर्भात १७ मागण्या समोर ठेवल्यात. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी होळीच्या दिवशी विरोध करत शिमगा साजरा केला.