Samruddhi Mahamarg काम करणाऱ्या 300 मजुरांवर उपासमारीची वेळ, 5 महिन्यांपासून वेतन न दिल्याने आक्रमक

Samruddhi Highway : मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटन करण्यात आले. मात्र ज्या मजुरांमुळे महामार्गाचे काम पूर्ण झाले, त्याच मजुरांना अद्याप त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. परिणामी या मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

Updated: Jan 3, 2023, 12:52 PM IST
Samruddhi Mahamarg काम करणाऱ्या 300 मजुरांवर उपासमारीची वेळ, 5 महिन्यांपासून वेतन न दिल्याने आक्रमक    title=

Mumbai Nagpur Samruddhi Expressway : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg)  शिर्डी ते नागपूरपर्यंत (Samruddhi Highway) खुला झाला आहे. हा महामार्ग हजारो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबईमधील अंतर कमी झाले तर दुसरीकडे हा महामार्ग उभारण्यासाठी ज्यांचा हात लागला त्यांच्यावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान समृद्धी महामार्गावरचा रस्ता तयार करणाऱ्या रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून मध्यप्रदेशातील 300 मजुरांना त्यांचे वेतन न दिल्याचे बातमी समोर आली आहे. या मजुरांना वेतन न मिळाल्याने त्यांनी रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

वाचा : आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match? 

रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनी मार्फत हजारो मजूर समृद्धी मार्गावर काम करीत होते. रात्रदिवस काम करून सुद्धा त्यांच्या घाम गाळलेल्या कामाचा मोबदला अद्याप मिळाला नाही. त्यामुळे या 300 मजुरांनी किनगावराजा पोलिसात तक्रार देण्यासाठी 15 किमी पायी जाऊन प्रयत्न केला. मात्र राहेरी नदी पुलावर हा मजुरांचा मोर्चा पोलिसांनी अडविला व कंपनीच्या जबाबदार व्यक्तीशी चर्चा केली. या चर्चेतून पुढील आठवड्यात या मजुराच्या खात्यात त्यांचे वेतन जमा होईल असे आश्वासन या मजुरांना देण्यात आले. तरीही या मजुरांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले असून  जोपर्यंत आमच्या मजुरीचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका मजुरांनी मांडली आहे.

यावेळी एमएसआरडीसीने अद्याप मजुरांचे पैसे न दिल्याचे स्वत: कबूल केले आहे. त्यामुळे या 300 मजुरांचे अडीच कोटी रुपये देणे बाकी असल्याचे कंपनीचे जे पी सिंग यांनी सांगितले आहे. दरम्यान मजुरांनी थोडा धीर धरावा असे सिंग यांचे म्हणणे आहे. पुढील आठवड्यात मजुरांच्या खात्यात त्यांची रक्कम जमा होईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे. आता समृद्धी महामार्गावर केलेल्या या 300 मजुरांना केव्हा मजुरी मिळेल याकडे मजुरांच्या कुटुंबंवाचे लक्ष लागून राहिले आहे. 

समृद्धी महामार्ग हा प्रकल्प डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र हा प्रकल्प 2022 मध्ये पूर्ण करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर 2015 मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. तेव्हापासून समृद्धी द्रुतगती महामार्ग हा चर्चेचा विषय बनला. या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करायच्या होत्या, त्या शेतकऱ्यांनी 2016 मध्ये विरोध केला होता. भरपाई देण्याबाबत कोणताही करार नव्हता. वाढवणे प्रकल्पासाठी 55,000 कोटी रुपयांची गरज हेही मोठे आव्हान होते. मात्र, आता पाच वर्षांनंतर समृद्धी द्रुतगती मार्ग हा जलद भूसंपादन आणि वाजवी मोबदल्याचे मॉडेल म्हणून ओळखला जात आहे. 

समृद्धी महामार्गाची प्रमुख वैशिष्ट्ये  

- महामार्गासाठी तब्बल 55,335.32 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
- हा महामार्ग 701 किमी लांबीचा, 8 पदरी, 120 मीटर रुंदीचा रस्ता 
- महामार्ग 10 जिल्ह्यातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जात आहे  
- या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास 8 तासात पूर्ण होईल 
- मुंबई आणि नागपूरमधील अंतर मालवाहतुक केवळ 16 तासात पार करेल
- हे अनेक औद्योगिक क्षेत्रे, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC), वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (WDFC), वर्धा आणि जालना ची ड्राय पोर्ट आणि मुंबईची JNPT यांना जोडेल. 
-  यात दोन्ही बाजूंना सेवा रस्ते असतील जे अंडरपासमधून जोडले जातील.
- यामध्ये जवळपास 50+ फ्लायओव्हर, 24+ इंटरचेंज, 5 पेक्षा जास्त बोगदे, 400+ वाहने आणि 300+ पादचारी
-  एक्स्प्रेसवेच्या संपूर्ण लांबीमध्ये विस्तृत लँडस्केपिंग, बोगद्याची प्रकाश व्यवस्था, पुलाचे सुशोभीकरण, सुधारित पथदिवे आणि डिजिटल संकेतांचा वापर केला जाईल.