नाशिक-पुणे महामार्गावर बर्निंग कारचा थरार

 इंजीनमधील शॉर्टसर्किटमुळे महागडी कार जळून भस्मसात झाली. 

Updated: Jul 1, 2018, 03:48 PM IST
नाशिक-पुणे महामार्गावर बर्निंग कारचा थरार title=

नाशिक :  संगमनेर इथं नाशिक पुणे महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. इंजीनमधील शॉर्टसर्किटमुळे महागडी कार जळून भस्मसात झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव वारिस खान, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि चालक असे तिघे नाशिककडून पुण्याकडे जात असताना ही घटना घडली. मर्सिडीज बेन्झ एस क्लासची सुमारे एक कोटी साठ लाखांची कार डोळ्यासमोर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना हताश होऊन पाहण्याशिवाय खान यांच्या हाती काहीच नव्हते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.