महाराष्ट्रातलं मेडिकल कॉलेज ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, तब्बल 82 विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात

महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट, सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

Updated: Dec 29, 2021, 06:16 PM IST
महाराष्ट्रातलं मेडिकल कॉलेज ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, तब्बल 82 विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात  title=

रविंद्र कांबळे, झी 24 तास, सांगली : राज्यात दिवसागणिक कोरोनाचा धोका जास्त वाढताना दिसत आहे. दुसरीकडे शाळा महाविद्यालयांमध्ये देखील कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. नवी मुंबई, अमरावती, औरंगाबादपाठोपाठ आता पश्चिम महाराष्ट्रतही कोरोनानं शिरकाव केला आहे. 

सांगलीमध्ये मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या 82 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 78 विद्यार्थिनी आणि 4 विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. 

कोरोनाची बाधा झालेले 82 विद्यार्थी हे MBBS शिकणारे असल्याची माहिती मिळाली आहे. या सगळ्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी 35 विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या होत्या. आता नवीन 47 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

महाविद्यालयातील 60 विद्यार्थ्यांचा स्वॅब पाठवण्यात आला होता. धक्कादायक आणि काहीशी चिंताजनक बाब अशी की, पॉझिटिव्ह आलेले या 35 विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. राज्यात कोरोनशिवाय ओमायक्रॉनचा प्रसारही वेगात होतोय. कोरोनाची बाधा झालेल्या विद्यार्थ्यांना मिरज इथल्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.