सांगलीतल्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाचं गुढ उकलंल,पोलीस तपासात झाला हत्येचा उलगडा

म्हैसाळ इथं एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची घटना  घडली होती. 

Updated: Jul 2, 2022, 07:29 PM IST
सांगलीतल्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाचं गुढ उकलंल,पोलीस तपासात झाला हत्येचा उलगडा   title=

सांगली : जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ इथं एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची घटना  घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. काही दिवसांपूर्वीच ही आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पोलिस तपासात या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला आहे.  

वनमोरे कुटुंबातील सामूहिक आत्महत्या प्रकरणी पोलिस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याआधीच्या तपासात जेवणात विषारी पदार्थ मिसळून या नऊ जणांची हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं. मात्र या कुटूंबाला हे विषारी औषध दिलं कोणी याचा तपास लागला होता. 

मात्र आता पोलीस तपासात वनमोरे कुंटुंबातील सदस्यांना तब्बल ९ बाटल्यांमध्ये मांत्रिकाने विषारी औषध प्यायला दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मात्रिकांच्या घरातून या हत्या प्रकणातील अनेक पुरावे देखील सापडले आहेत.  

गुप्तधनासाठी मांत्रिकाला दिले पैसे 

गुप्तधन मिळवण्यासाठी मांत्रिकाला वनमोरे कुटुंबाकडून ४ वर्षांपासून पैसे देण्यात येत होते. मात्र, गुप्तधन मिळत नसल्याने पैसे परत देण्याचा तगादा वनमोरे कुटुंबाकडून मांत्रिकासमोर लावला होता. या सततच्या तगाद्याला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे.   

या कुटूंबाने आत्महत्या करण्यापूर्वी काळ्या जादूचा विधी देखील झाल्याचं समोर आलं आहे. या विधीमध्ये गुप्तधन प्राप्तीसाठी वनमोरे कुटुंबाला अकराशे गहू मोजण्यासाठी लावले. तसेच आत्महत्येआधीच वनमोरे कुटुंबाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. धक्कादायक बाब म्हणजे वनमोरे कुटुंबाचे सुसाईड नोटच्या २ प्रती या मांत्रिकाच्या घरात सापडल्या आहेत.

दरम्यान आतापर्यत या प्रकरणात दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. अब्बास महंद बागवान आणि धीर चंद्रकांत सरवशे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहे. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आला आहे.  

नेमकी घटना काय?

म्हैसाळ इथल्या नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक आलगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहात होते. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर इथं दुसरं घर आहे. यापैकी एका घरात सहा मृतदेह आढळून आले होते. तर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. मृतांमध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 48), अर्चना पोपट वनमोरे ( वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28), माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वन (वय 15) अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि अक्काताई वनमोरे (वय 72) या नऊ जणांचा समावेश आहे.