Maharashtra Politics: मला तुरुंगात टाकलं, त्यांना तुरुंगात टाकणार; संजय राऊत मोठा राजकीय बॉम्ब फोडणार

उद्धव ठाकरेंसोबत नागपुरात बरेच मोठे बॉम्ब फोडू असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला दिला आहे. ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांच्या फायली तयार असून त्यांनाही जेलमध्ये टाकणार असही संजय राऊत म्हणाले.  आम्ही पाठीमागून नव्हे समोरून वार करणारे आहोत असा इशाराच राऊतांनी शिंदे गट आणि भाजपला दिला आहे. 

Updated: Dec 25, 2022, 10:56 PM IST
Maharashtra Politics: मला तुरुंगात टाकलं, त्यांना तुरुंगात टाकणार; संजय राऊत मोठा राजकीय बॉम्ब फोडणार title=

Maharashtra Winter Session 2022 : नागपूर हिवाळी अधिवेशनाचा सोमवारपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. महाविकास आघाडी पुन्हा आक्रमक होणार  आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्यांनी आपल्याला तुरुंगात टाकलं, त्यांना तुरुंगात टाकणार असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचे म्हणत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.  संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसह( Uddhav Thackeray ) ठाकरे गटातील नेत्यांची मौठी फौज नागपुरात दाखल होणार आहे(Maharashtra Politics).  

ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांच्या फायली तयार आहेत

उद्धव ठाकरेंसोबत नागपुरात बरेच मोठे बॉम्ब फोडू असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला दिला आहे. ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांच्या फायली तयार असून त्यांनाही जेलमध्ये टाकणार असही संजय राऊत म्हणाले.  आम्ही पाठीमागून नव्हे समोरून वार करणारे आहोत असा इशाराच राऊतांनी शिंदे गट आणि भाजपला दिला आहे. आज रात्री आदित्य ठाकरे,संजय राऊत, वरूण सरदेसाई नागपुरात पोहचतील. तर  उद्धव ठाकरे उद्या सकाळी 11.30 वा. नागपुरात दाखल होतील,. असे संजय राऊत यांनी सांगितले. 

महाविकास आघाडी पुन्हा आक्रमक होणार 

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा उद्यापासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. महाविकास आघाडी पुन्हा आक्रमक होणार हे स्पष्ट आहे. भूखंड घोटाळ्याच्या आरोपांवरून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, सीमावाद, या प्रश्नांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. दिशा सालियन प्रकरणात एसआयटी नेमण्याचा मुद्दाही चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे सोमवारपासून विधानपरिषदेच्या कामकाजात सहभागी होतील. विदर्भातील प्रश्नांच्या मुद्यांवरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होण्याची शक्यता आहे. विरोधक विधान पायरीवर सकाळी आंदोलन करतील. तर दुसरीकडे सत्ताधारी यांनी पुन्हा दिशा सालिया प्रकरण यावरून आक्रमक होत महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत.

अजित पवार यांची कार्य पद्धती यावर महाविकास आघाडीत नाराजी सूर आता उद्धव ठाकरे यात लक्ष घालत महाविकास आघाडीत ऐक्य दिसणार का याकडे देखील लक्ष लागले आहे. विदर्भ मराठवडा समस्या यावर सत्ताधारी विरोधक चर्चा होणार आहे. लोकायुक्त विधेयक सोमवारी मांडले जाणार आहे.

मागील आठवड्यात विरोधक काही मुद्दावर आक्रमक झाले पण त्यात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले यावर शिस्तभंगाची कारवाई झाली. त्यांवरून सभागृह गोंधळ झाला तसच सीएम शिंदे भूखंड राजीनामा विरोधक आक्रमक दिसले तर दुसरीकडे दिशा सालिया मृत्यू प्रकरण यावरून आदित्य ठाकरे महाविकास आघाडी कोंडी झाली होती.