शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार- संजय राऊत

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

Updated: Nov 15, 2019, 10:02 AM IST
शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार- संजय राऊत

मुंबई : फॉर्मुलाची चिंता करु नका, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरु असल्याचे त्यांनी म्हटले. सत्तास्थापनेचा तिढा सुरु झाल्यापासून संजय राऊत आपल्या पक्षाची बाजू घेऊन भाजपावर तोफ डागत आहेत. आज देखील त्यांनी भाजपाला टोला लगावला. काँग्रेस, राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 

पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर बोलणं टाळल्याचे राऊत यावेळी म्हणाले. येऊन-जाऊन नव्हे तर सत्ता आता शिवसेनेचाच असेल असेही त्यांनी सांगितले. शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात येत जात राहणार नाही. आम्ही सत्तेत येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेसोबत आता अनुभवी नेते आहेत त्यामुळे सत्तावाटपात अडचणी येणार नसल्याचे ते म्हणाले.