तुकोबांच्या पालखी रथाचा मान 'या' गावच्या बैलजोडीला

वारीत सहभागी होताना पालखी रथाला बैलजोडी देण्याचा मान मिळावा अशी इच्छा अनेक शेतकरी वारकऱ्यांची असते. 

Updated: Jun 30, 2018, 08:01 AM IST
तुकोबांच्या पालखी रथाचा मान 'या' गावच्या बैलजोडीला  title=

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला यावर्षी ५ जुलैपासून सुरूवात होतेय. पालखी सोहळ्यासाठी यावर्षी चाकणच्या कुरूळी गावच्या बाळासाहेब कड यांना मान मिळालाय. वारीत सहभागी होताना पालखी रथाला बैलजोडी देण्याचा मान मिळावा अशी इच्छा अनेक शेतकरी वारकऱ्यांची असते. चाकणच्या कुरुळी गावच्या कड कुटुंबियांचं हे स्वप्न पूर्ण झालंय. बाळासाहेब कड यांच्या सर्जा-राजा या बैल जोडीला यंदा हा मान मिळालाय.

कड कुटुंबीयात उत्साह

अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची सेवा करण्याची इच्छा सर्वच जण बाळगून असतात.. या सोहळ्यात पालखीच्या बैलजोडीचा मान मिळणं ही भाग्याचीच गोष्ट आहे... म्हणूनच हे भाग्य लाभाल्यामुळे कड कुटुंबीय भलतेच खुश आहेत.