हे सुंदर दृश्य आहे महाराष्ट्रातलं

ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्राच्या माळरानावर, हे नयनरम्य दृश्य पाहायला मिळालं. सुरुवातीला पडलेला काहीसा पाऊस आणि त्या पावसानं हिरवगार झालेलं माळरान.  

Updated: Jul 14, 2017, 03:51 PM IST
हे सुंदर दृश्य आहे महाराष्ट्रातलं title=

नाशिक : सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.... एका कवितेत वर्णन केलेलं हे दृश्य, प्रत्यक्ष पाहायला मिळालं ते नाशिकमधल्या येवला तालुक्यातल्या राजापूरजवळ. ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्राच्या माळरानावर, हे नयनरम्य दृश्य पाहायला मिळालं. सुरुवातीला पडलेला काहीसा पाऊस आणि त्या पावसानं हिरवगार झालेलं माळरान.  

अशा या हिरव्या माळरानावर मुक्तपणे वावरणारा हरणं आणि काळविटांचा कळप. या हिरव्यागार कुरणांमध्ये मनसोक्त मौजमस्ती करत हुंदडणारे बागडणारे हे गोजिरे प्राणी. त्यातच काळविटांच्या लुटुपुटूच्या लढाई, वा-याशी स्पर्धा करत लांबचलांब उड्या मारत पळणारे हरणांचे कळप, आपल्या पाडसांसोबत चरणा-या हरणी, असं हे सारं विलोभनीय दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं असंच होतं.