School Bus Fees : पालकांनो इकडे लक्ष द्या, नव्या शैक्षणिक वर्षात स्कूल बस शुल्कात मोठी वाढ

School Bus Fees : आता राज्यभरात स्कूल बसच्या शुल्कामध्ये मोठी वाढ होणार आहे. 01 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षात स्कूल बसचे भाडे वाढणार आहे. त्यामुळे पालकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Updated: Mar 24, 2023, 08:12 AM IST
School Bus Fees : पालकांनो इकडे लक्ष द्या, नव्या शैक्षणिक वर्षात स्कूल बस शुल्कात मोठी वाढ title=

School Bus Fees : शैक्षणिक वर्षात पालकांच्या खिशावर स्कूल बस शुल्काचा भार पडणार आहे. कारण स्कूल बस असोशियनने बसचे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. (Increase in School Fees Fees) त्यामुळे1 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षात स्कूल बस शुल्क वाढणार आहे. आधीच महागाईने होरपळणाऱ्या जनतेला आता आणखी एक धक्का बसला आहे. ( School Bus Fares :  School bus fees will be hiked by 15-20 % from April 1)  

स्कूल बसच्या शुल्कामध्ये 15 ते 20 टक्के वाढ 

आता राज्यभरात स्कूल बसच्या शुल्कामध्ये 15 ते 20 टक्के वाढ होणार आहे. 01 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षात स्कूल बसचे शुल्क वाढणार आहे. सरकारच्या जुन्या गाड्या भंगारात काढण्याच्या निर्णयामुळे स्कूल बसच्या भाड्यांमध्ये वाढ होणार आहे. आम्ही आधीच मोठ्या खर्चाचा सामना करत आहोत. त्यात पुढील महिन्यापासून नवीन प्रदूषण नियमांनुसार आमची वाहने अपग्रेड करणे. यामुळे आम्हाला प्रति बस सुमारे 1.5 लाख ते 2 लाख रुपये खर्च आला आहे, असे स्कूल बस असोशियन म्हटले आहे.

सरकारच्या नव्या धोरणामुळे बसच्या किमतीत वाढ ?

1 एप्रिल 2023 पासून नवीन शैक्षणिक वर्षासाठी स्कूल बसचे शुल्क वाढले आहे. स्क्रॅब मॉडेलच्या सरकारच्या या धोरणामुळे 15 ते 20  टक्के हे शुल्क वाढणार आहे. दरम्यान, सरकारच्या नव्या धोरणामुळे बसच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे बस उत्पादक कंपनीने दीड ते दोन लाखांच्या दरात वाढ केली आहे. आता नवीन बसचे दर 28 लाख रुपयांच्या घरात आहेत. मिनी बससाठी 21 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच सर्व स्पेअर पार्ट्स टायर, बॅटरीचे दर 12 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत, अशी माहिती स्कूल बस असोशियन दिली आहे.

तसेच चालक यांच्याही  पगारात  2500 ते 3000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हा आर्थिक बोजा पालकांवर पडणार आहे. तसेच बस पार्किंगसाठी दंडही भरावा लागत आहे. यामुळे आम्हाला ही स्कूल फीत वाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे स्कूल बस असोशियन म्हटले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये ऑपरेटर्सनी फीमध्ये 10 टक्के वाढ केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा बस भाडेवाढ होणार असल्याने पालकांच्या खिशावर मोठा  भार पडणार आहे.