ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत राहणार बंद

मुंबईपाठोपाठ ( Mumbai School) आता ठाणे  (Thane) जिल्ह्यातील शाळाही २३ नोव्हेंबरला सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट करण्यात आले.  

Updated: Nov 20, 2020, 07:30 PM IST
ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत राहणार बंद
Pic Courtesy : PTI

ठाणे : मुंबईपाठोपाठ ( Mumbai School) आता ठाणे  (Thane) जिल्ह्यातील शाळाही २३ नोव्हेंबरला सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शाळा (School) या ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. ( Schools closed till December 31 in Thane District) ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना या संदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे शाळा या नवीन वर्षात तरी सुरु होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

शाळेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार

ठाणे जिल्हा, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या ठिकाणीही शाळा ३१ तारखेपर्यंत बंदच राहणार आहेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

२३ नोव्हेंबरपासून राज्यांमधल्या शाळा उघडल्या जाव्यात, असे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र त्याचवेळी शाळा उघडण्याचा निर्णय त्या त्या जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनांनी घ्यावा, असेही म्हटले आहे. आज मुंबई महापालिका प्रशासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा उघडणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत उघडणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा या ऑनलाईनच सुरु राहण्याची शक्यता आहे.