पुणे : दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला एकूण १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
१६ लाख ३७ हजार ७८३ नियमित विद्यार्थी आहेत. राज्यातील ९ लाख ७३ हजार १३४ विद्यार्थी आणि ७ लाख ७८ हजार २१९ विद्यार्थिनी या परीक्षेला बसणार आहेत.
संपूर्ण राज्यात ४ हजार ६५७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच १० वी च्या परीक्षेलाही १०.३०ला परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य असणार आहे.
उत्तर पत्रिका आणि पुरवणीवर बरकोडची छपाई करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी सात या प्रमाणे संपूर्ण राज्यात २५२ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.