पिंपरी चिंचवड | स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, ४ मुलींची सुटका, २ अटकेत

पिंपरी चिंचवड शहरात काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रात्री बार आणि काही लॉजवर देखील धाड टाकली

Updated: Sep 20, 2021, 08:15 PM IST
पिंपरी चिंचवड | स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, ४ मुलींची सुटका, २ अटकेत

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे, यात ४ तरुणींना सोडवण्यात पोलिसांना यश आलं असल्याचं म्हटलं जात आहे. या मुलींचा सेक्स रॅकेटसाठी वापर करणाऱ्या २ जणांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यवसाय शहरातील काळेवाडी परिसरातील एका स्पामध्ये सुरु होता.

पिंपरी चिंचवड शहरात काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रात्री बार आणि काही लॉजवर देखील धाड टाकली होती. जगताप डेअरी परिसरातील एका बार आणि एका लॉजचा यात समावेश होता. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी यावेळी येथे २०० हून अधिक तरुण तरुणींना ताब्यात घेतलं होतं.

तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला काळेवाडी परिसातील एका स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती, यावेळी पोलिसांनी ४ मुलींची सुटका केली तर स्पा चालक २ जणांना अटक केली आहे.