अनाथ आश्रमात चिमुकल्यांवर मौलानाकडून लैंगिक अत्याचार

बाल हक्क कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीनं त्यांची सुटका केलीय

Updated: Jul 28, 2018, 12:09 PM IST
अनाथ आश्रमात चिमुकल्यांवर मौलानाकडून लैंगिक अत्याचार

पुणे:  पुण्यात मुस्लीम अनाथ आश्रमातील अल्पवयीन मुलांवर तिथल्या मौलानानं लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी मौलाना रहीम या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. कोंढवा परिसरात हा अनाथाश्रम आहे. इथली दोन मुलं काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकावर भेदरलेल्या अवस्थेत आढळून आली होती.

बाल हक्क विषयात काम करणाऱ्या 'साथी' संस्थेनं या मुलांना बाल कल्याण समितीकडे सोपवलं होतं. त्या मुलांकडे अधिक चौकशी केली असता अनाथ आश्रमात सुरु असलेल्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्याच त्रासापायी ती मुलं पळून आली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

इथला मौलाना त्यांना मारहाणही करायचा असही त्यांनी सांगितलं. या अनाथ आश्रमात एकूण ३६ मुलं आहेत. बाल हक्क कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीनं त्यांची सुटका केलीय. 

यातील बहुतेक मुलं ही बिहारमधील आहेत. शिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांना इथं आणलं गेलंय. यातील अनेक मुलांचे पालक हयात असल्याचंही कळतंय. त्यामुळे याठिकाणी मानवी तस्करीचाही संशय व्यक्त होतोय.