यवतमाळमध्ये ११ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

 मारेगाव शहरात अकरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना

Updated: Jun 20, 2019, 08:39 PM IST
यवतमाळमध्ये ११ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

यवतमाळ : मारेगाव शहरात अकरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. त्यानंतर आरोपीला आता कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होते आहे. पीडितेच्या आईने केलेल्या तक्रावरीवरुन मारेगाव पोलिसानी आरोपी मोहम्मद ईद्रीस शेख अब्दुल शेख यास अटक केली आहे. पीडित मुलगी वडिलांसोबत आरोपीच्या घरी गेली असता त्याने हे दुष्कृत्य केले.

 ही मुलगी घरी परतल्यावर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याची परिसरात दहशत आहे. संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर जमा होत आरोपीला कडक शिक्षेची मागणी केली आहे.