chandrayaan 3 : भाराताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिग केली आहे. सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचे कौतुक करताना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. शहाजी बापू पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करताना मिश्किल टोलेबाजी केली आहे. या मिश्लिक टोलेबाजीतून शहाजी बापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांची एक चूक झाली चंद्रयान मध्ये संजय राऊत यांना तेवढं पाठवला असतं तर सगळी किरकिर मिटली असती असे टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे.
शरद पवार यांच्याकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं खास कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं खास कौतुक केलंय.. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानं पवारांनी आनंद व्यक्त केला.. जगाला पुढं नेण्यास भारतीय शास्त्रज्ञ सक्षम आहेत, असं गौरवोद्गार पवारांनी काढले.
शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा शहाजी बापू पाटील देखील 40 आमदारांसोबत गुवाहाटीला गेले होते. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी फोन द्वारे कार्यकर्त्यांशी फोनवर साधलेला संवाद व्हायरल झाला होता. काय झाडी, काय डोंगर... असं म्हणत शहाजी बापू पाटील यांनी गुवाहाटीचे वर्णन केले. त्यांचा काय झाडी, काय डोंगर... हा डायलॉग चांगलात फेमस झाला होता.
मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो. मात्र माझ्या नीतीमत्तेत ते बसत नव्हतं असं उद्धव ठाकरे आपल्या पदाधिका-यांसमोर म्हटले. ज्यांनी 2014 पासून आपल्याला फसवलं त्यांच्यासोबत कसं काय जाणार असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री होतो, आमदारांना डांबून ठेऊ शकलो असतो मात्र जे मनाने फुटले त्यांना डांबून काय उपयोग असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. यावर आमदार शहाजी बापू पाटील यांनी पलटवार केला आहे. तुम्ही स्वतः ला डांबून ठेवले त्यामुळे ही वेळ आली. आता आम्हाला कुठ डांबून ठेवता असा पलटवार शहाजी बापू पाटील यांनी केला.