शहीद नायक किरण थोरात यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

 पाकिस्तानकडून झालेल्या अंदाधुंद गोळीबारात नियंत्रण रेषेवर जवान किरण थोरात देशासाठी शहीद झाले. 

Updated: Apr 13, 2018, 07:35 AM IST
शहीद नायक किरण थोरात यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यतील नायक किरण थोरात देशसेवेसाठी कामी आले आहे. बुधवारी पाकिस्तानकडून झालेल्या अंदाधुंद गोळीबारात नियंत्रण रेषेवर हा वीर जवान देशासाठी शहीद झाला. गुरुवारी रात्री त्यांचे पार्थिव औरंगाबादला आले आहे. आज शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान  वैजापूर तालुक्यतील फकिराबादवाडी या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत.

किरण  थोरात यांच्या घरी आणि गावात त्यांच्या जाण्याने शोकाकुल वातावरण आहे. गावातील सगळ्यांची पावले आज किरणच्या घराकडे धाव घेत आहेत. कुटुंबीयांचे आपल्या परिने सांत्वन करीत आहेत. ११ वर्ष किरण यांनी देशसेवा केली आहे. मात्र बुधवारी झालेल्या चकमकीत ते जखमी झाले आणि संध्याकाळी ते शहीद झालेत. त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.