शरद पवारांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सल्ला

एकनथा शिंदे बंडखोरीनंतर राजकीय हालचालींना वेग, शरद पवारांचा मविआच्या नेत्यांना सल्ला

Updated: Jun 26, 2022, 10:39 AM IST
शरद पवारांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सल्ला title=

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकरलं आहे. त्याच्यासोबत बहुमत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. आता ही लढाई कायदेशीर मार्गाने दोन्ही गटांना लढावी लागणार आहे. 

शरद पवारांच्या भेटीला शिवसेना, काँग्रेसचे नेते आले होते. भेटायला आलेल्या पैकी एकही नेता न बोलताच बाहेर पडले. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सिल्व्हर ओकवरून काहीही न बोलता निघाले. 

शिवसेना नेते अनिल देसाई, अनिल परबही न बोलताच निघाले. मात्र महाविकास आघाडी भक्कम राहील, कोर्टात ही भूमिका व्यवस्थितीत राहील असा सल्ला शरद पवार यांनी महाविकास आघाडी नेत्याना दिला.

सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत शरद पवारांनी हा सल्ला दिलाय. शिवसेना कायदेशीर प्रक्रिया कशी पार पाडत आहे याची माहिती अनिल देसाई आणि परब यांनी शरद पवार यांना दिली. 

एकनाथ शिंदे गट नेता आणि 16 आमदार निलंबन यासाठी कायदेशीर मुद्दे कोर्टात कोणते मांडणार याचा आढावा पवार यांनी घेतला. ही लढाई कायदेशीरपद्धतीनं लढायला हवी आणि कोर्टात कोणते आणि कसे मुद्दे मांडता येतील यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.