'मुख्यमंत्री माझं ऐकतात, हे खरं नाही'

बोंडअळीग्रस्त कापसाची त्यांनी आज यवतमाळमध्ये जाऊन पाहणी केली तेव्हा, काही शेतकऱ्यांनी शरद पवारांकडे व्यथा मांडली.

Updated: Nov 17, 2017, 01:21 PM IST
'मुख्यमंत्री माझं ऐकतात, हे खरं नाही' title=

यवतमाळ : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज यवतमाळ दौऱ्यावर आहे, बोंडअळीग्रस्त कापसाची त्यांनी आज यवतमाळमध्ये जाऊन पाहणी केली तेव्हा, काही शेतकऱ्यांनी शरद पवारांकडे व्यथा मांडली.

शेतकरी काय म्हणाले पवारांना...

यावेळी काही शेतकऱ्यांनी शरद पवारांनी सांगितलं की, आमच्या व्यथा तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, कारण मुख्यमंत्री तुमचं ऐकतात, त्यावर शरद पवार म्हणाले, 'मुख्यमंत्री माझं ऐकतात, हे खरं नाही'

शरद पवार आज यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर

गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. कीटकनाशक फवारणीने दगावलेल्या शेतकरी, शेतमजुर कुटुंबीयांच्या सांत्वनपर ते भेट घेत आहेत.

शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा

यासंह बीटी कपाशीवर प्रादुर्भाव बोंडअळीग्रस्त शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करीत आहेत. त्यानंतर यवतमाळ मध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला शरद पवार हे संबोधित करणार आहेत.