राज्यसभा निवडणूक : निकालानंतर शरद पवार यांची पहिली खोचक प्रतिक्रिया

Sharad Pawar's first  reaction after the Rajya Sabha Result : राज्यसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक वगैरे अजिबात नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.  

Updated: Jun 11, 2022, 09:40 AM IST
राज्यसभा निवडणूक : निकालानंतर शरद पवार यांची पहिली खोचक प्रतिक्रिया title=

पुणे : Sharad Pawar's first  reaction after the Rajya Sabha Result : राज्यसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक वगैरे अजिबात नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच भाजपच्या कोट्यात फरक पडला नाही. पण अपक्षांच्या मतांच्या कोट्यात गंमती झाल्यात असं पवार यांनी म्हटल आहे. विरोधकांकडे जाणारं अपक्षांचं एक मत प्रफुल्ल पटेल यांना मिळाल्याचा दावा पवार यांनी केला आहे. मात्र पवारांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक केलं.  

हा निकाल माझ्यासाठी अनपेक्षित असा अजिबात नाही. प्रत्येकाकडे असलेल्या मतांच्या संख्येचा विचार करता हा निकाल अपेक्षित होता. अपक्षांची मते विरोधकांना मिळाली आहेत. विरोधकांना सोबत असलेलं एक मत आमच्या प्रफुल्ल पटेल यांना मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेतली. राजकारणात रिस्क घ्यावीच लागते, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री यांचा निर्णय योग्यच होता यावर पवार यांनी सहमती दर्शवली.

मतदानाच्या समन्वयात आमच्याकडून काही त्रुटी राहिली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या मार्गांनी मते खेचण्यात यश मिळवलं. त्याचा हा चमत्कार आहे, असे कौतुक पवार यांनी फडणवीस यांचे केले. मतमोजणी बाबत झालेला उशीर म्हणजे भाजपचा रडीचा डाव
या निकालाचा सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार नाही, असे पवार म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीत तीनही जागा निवडून आणण्याची भाजपची खेळी यशस्वी झालीय. राज्यसभा निवडणुकीत भाजपला  महाविकास आघाडीची 9 ते 10 मतं मिळवण्यात यश आलं आहे. भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं धनंजय महाडिक यांचा विजय झाला. शिवसेनेचे दुसरे आणि महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. पहिल्या फेरीत संजय पवार यांना 33 मतं मिळाली होती. तर, धनंजय महाडिक यांना 27 मतं मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. संख्याबळ नसतानाही महाडिक यांना 41 मतं पडली. त्यामुळे महाडिक विजयी झाले. या निवडणुकीत महाविकासआ आघाडीची तब्बल 10 मतं फुटली आहेत. विशेष म्हणजे 17 अपक्ष आमदार सोबत असतानाही महाविकास आघाडीचे 10 आमदार फुटले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.