शरद पवारांचा 'समृद्धी'ला विरोध

मुंबईहून नागपूरला जायला तीन महामार्ग असताना चौथा महामार्ग हवाच कशाला असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवलाय.

Updated: Jun 12, 2017, 05:24 PM IST
शरद पवारांचा 'समृद्धी'ला विरोध title=

औरंगाबाद : मुंबईहून नागपूरला जायला तीन महामार्ग असताना चौथा महामार्ग हवाच कशाला असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवलाय. अजून जुनी कामं पूर्ण झालेली नाहीत आणि आता समृद्धी महामार्गावर नवी शहरं निर्माण करणार आहेत. मात्र याला किती काळ लागणार याचा अंदाज सरकारला आहे का असा प्रश्नही पवारांनी केलाय.

विकास जमीनी शिवाय होणार नाही मात्र विकास करताना कुणाला उध्वस्त करू नका आणि रस्त्यावर आणू नका असा सल्लाही त्यांनी सरकारला दिलाय. यांनी गुगलवर पाहणी केली आणि निर्णय घेतले. खाली काय चाललं आहे हे पाहिलंच नाही. साक्षात जाऊन पाहणी केल्यावर यांना नक्की त्या जागेवर काय आहे ते कळेल, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.