शरद पवारांकडून सावरकरांची स्तुती, म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर...

. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागाविषयी चर्चाच होऊ शकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

Updated: Dec 6, 2021, 01:25 PM IST
शरद पवारांकडून सावरकरांची स्तुती, म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर...

नाशिक: मराठी साहित्य संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस होता. याच्या समारोप कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकरांची स्तुती केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागाविषयी चर्चाच होऊ शकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

नाशिकमध्ये साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात त्यांनी सावरकरांविषयी गौरवोगद्गार काढले. साहित्यनगरीला सावरकरांचं नाव न दिल्यावरून भाजपनं टीका केली होती. हा संदर्भ घेऊन विज्ञानवादी सावरकरांबाबत वाद होणं चुकीचं असल्याचं पवार म्हणाले आहेत. 

साहित्य नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव न दिल्याने भाजपने टीका केली होती. हा संदर्भ घेऊन विज्ञानवादी सावरकरांवरून वाद होणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. सावरकरांच्या त्यागाविषयी चर्चाच होऊ शकत नाही. 

सावरकर विज्ञानवादी होते.  स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात की गाय उपयुक्त पशू तिचा लाभ घ्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लिखाण अजरामर ते आगळेवेगळे व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्यसाठीचे त्यांचे योगदान अतुलनीय होते. सावरकर विज्ञानवादी होते त्यामुळे त्यांच्या बाबतीत वाद होणे दुर्दैवी असंही शरद पवार म्हणाले आहेत.