शशी थरूरांसाठी संसद आकर्षणाचं ठिकाणं? महिला खासदारांसोबतचा फोटो Twitter वर ट्रोल

पुन्हा एकदा शशी थरूर चर्चेत 

Updated: Nov 30, 2021, 08:51 AM IST
शशी थरूरांसाठी संसद आकर्षणाचं ठिकाणं? महिला खासदारांसोबतचा फोटो Twitter वर ट्रोल

मुंबई : कायमच आपल्या सडेतोड बोलण्यामुळे चर्चेत असलेले काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor)चर्चेत असतात. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शशी थरूर यांनी संसद परिसरातून ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. जो फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे शशी थरूर चांगलेच ट्रोल झाले आहेत.

कॅप्शनमुळे झाले ट्रोल 

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर काही महिला खासदारांसोबत उभे असल्याचे दिसत आहे. शशी थरूर यांनी या फोटोला कॅप्शन दिले की, 'कोण म्हणतं लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाही? आज सकाळी माझ्या सहकारी खासदारांसोबत. या सेल्फीबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही, मात्र लोकांनी कॅप्शनबद्दल नाराजी व्यक्त केली. या कॅप्शनवरून सोशल मीडिया यूजर्स शशी थरूर यांना ट्रोल करत आहेत.

महिला MP फक्त लूककरता चर्चेत

शशी थरूर यांच्या ट्विटवर वकील करुणा नंदी म्हणाल्या, 'हे आश्चर्यकारक आहे. शशी थरूर यांनी निवडून आलेल्या राजकारण्यांना त्यांच्या दिसण्यापुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्वतःला केंद्रस्थानी दाखवले आहे. हे 2021 आहे मित्रांनो.'

द्याव लागलं स्पष्टीकरण

सातत्याने ट्रोल झाल्यानंतर खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटवर स्पष्टीकरण दिले. त्यांनी लिहिले, 'सेल्फीचा उद्देश मजेदार होता आणि त्यांनीच मला त्याच भावनेने ट्विट करण्यास सांगितले, काही लोकांना वाईट वाटले याबद्दल मला खेद वाटतो. परंतु मला अशा आनंदी वातावरणात काम करायला आवडतं. एवढंच.