शिंदे गट आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत; 400 नगरसेवकांची यादी तयार?

गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण हादरवून सोडणारे तसेच बंडखोरी करणारे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. 

Updated: Jun 24, 2022, 09:30 AM IST
शिंदे गट आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत; 400 नगरसेवकांची यादी तयार? title=
छाया सौजन्य : सोशल मीडिया

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण हादरवून सोडणारे तसेच बंडखोरी करणारे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 हून अधिक आमदार आहेत. परंतू आता राज्यातील 400 हून अधिक नगरसेवक शिंदे गटात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेचे काही खासदारदेखील शिंदे गटात सामिल होऊ शकतात.

शिवसेनेचे 18 खासदारांपैकी 13 ते 14 खासदार कोणत्याही क्षणी शिंदे गटाला सामिल होऊ शकतात. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, पालघर जिल्हा तसेच इतर महापालिकांमधील जवळपास 400 नगरसेवक शिंदे गटात सामिल होऊ शकतात. शिवसेनेसाठी स्थानिक राजकारणात कॉंग्रेस राष्ट्रावादी अडसर ठरत असून त्यामुळे हे नगरसेवकही शिंदे गटात सामिल होऊ शकतात. अशी माहिती मिळतेय.

आमदारांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिवसेनेत फूट पडल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी तो मोठा धक्का मानला जाईल. शिंदे यांच्याकडे तयार होत असलेल्या नगरसेवकांची यादीतील बहुतांश नगरसेवकांची टर्म मार्चमध्ये संपली आहे. नवीन महापालिका निवडणुकांची ते वाट पाहत आहेत.