लॉकडाऊन काळात शिर्डीत साईंचरणी इतक्या कोटींचं दान

भक्तांकडून साईंचरणी ऑनलाईन माध्यमातून दान करण्यात येत आहे.

Updated: May 16, 2020, 09:25 PM IST
लॉकडाऊन काळात शिर्डीत साईंचरणी इतक्या कोटींचं दान title=
संग्रहित फोटो

शिर्डी : कोरोना व्‍हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर १७ मार्चपासून साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलं आहे. साईबाबा मंदिर बंद असलं तरी भक्तांना साईबाबाचं ऑनलाईन दर्शन घेता येत आहे. भक्तांकडून साईचरणी ऑनलाईन माध्यमातून दानही करण्यात येत आहे. 

१७ मार्च २०२० ते १६ मे २०२० या ६० दिवसांच्‍या कालावधीत २१ हजार ६४९ साईभक्‍तांकडून ऑनलाईनद्वारे दान करण्यात आलं आहे. साई भक्तांकडून ३ कोटी २२ लाख १० हजारांहून अधिक रुपयांची देणगी देण्यात आली आहे. साई बाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शिर्डीत साईंच्या चरणी भक्तांकडून वर्षभरात जवळपास ६०० कोटी रुपयांचं दान केलं जातं. म्हणजेच जवळपास दररोज १ कोटी ६४ लाख रुपयांहून अधिक दान दिलं जातं. मात्र लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळांच्या देणगीवरही याचा परिणाम होतो आहे.

लॉकडाऊनचा फटका, साई बाबा मंदिर संस्थानला दररोज इतक्या कोटींचं नुकसान

दरम्यान, देशातील आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. याचा फटका सर्वच स्तरांतील संस्थानांना बसला आहे. धार्मिक स्थळांच्या दान पेट्यांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन कसं द्यावं असा मोठ्या प्रश्न मंदिर प्रशासनाला पडला आहे. या काळात शिर्डी संस्थानाने गुंतवणुकीच्या आलेल्या पैशातून कर्मचाऱ्यांना वेतन दिलं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

जगातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांपैकी एक असणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान, मंदिर प्रशासनाला लॉकडाऊनच्या काळात जवळपास ४०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 

'जून अखेरपर्यंत...' कोरोनाबाबत आरोग्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती