साईसमाधीशताब्दी सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी शिर्डीत

साईसमाधीशताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने येणाऱ्या सगळ्या भाविकांची योग्य सोय होईल, असा विश्वास साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी व्यक्त केलाय.

Updated: Oct 17, 2018, 08:36 PM IST
साईसमाधीशताब्दी सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी शिर्डीत  title=

शिर्डी : साईसमाधीशताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने येणाऱ्या सगळ्या भाविकांची योग्य सोय होईल, असा विश्वास साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी व्यक्त केलाय.

साईबाबा समाधी शताब्दीच्या निमित्तानं यंदा शिर्डीत भाविकांची रीघ लागलीय. विजयादशमीच्या उत्सावाला शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलीय. पुढचे तीन दिवस उत्सव चालणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या उत्सावात सामील होणार आहेत. 

समाधीचं शताब्दी वर्ष असल्यानं संस्थानच्यावतीनं भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज सकाळी बाबांच्या काकड आरतीने सोहळा सुरू झालाय. लक्ष लक्ष दिव्यांनी शिर्डी उजळून निघालीय. शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला आलेले भाविक साई समाधी मंदिर, व्दारकामाई, चावडी,गुरूस्थान या बाबांच वास्तव्य असलेल्या या ठिकाणांचं भक्तीभावानं दर्शन घेतात. शिर्डीत साईबाबांचं सगळ्यात पहिल्यांदा दर्शन झालं ते खंडोबा मंदिरात.