साईबाबाचरणी नाणीच नाणी..., शिर्डी संस्थानसह बँकांची डोकेदुखी वाढली

Shirdi Sai Baba :  शिर्डीतील साईचरणी दरवर्षी मोठ्याप्रमाणात भक्तांकडून देणगी स्वरुपात नाणी जमा होत आहेत. आता या नाण्यांचे करायचे काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाण्यांमुळे संस्थानच्या बँकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड ते दोन कोटींची नाणी साचल्याने बँकांना जागा अपूरी पडू लागली आहे. 

Updated: Apr 20, 2023, 10:07 AM IST
साईबाबाचरणी नाणीच नाणी..., शिर्डी संस्थानसह बँकांची डोकेदुखी वाढली title=

Shirdi Sai Baba : बातमी साईनगरी शिर्डीतून. साईचरणी दर वर्षी 350 कोटींची नाणी जमा होत आहेत. या नाण्यांचे करायचे काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाण्यांमुळे संस्थानच्या बँकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड ते दोन कोटींची नाणी साचल्याने बँकांना जागा अपूरी पडू लागली आहे. छत्रपती कॉम्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कॅनरा बँकेतर तर तीन ट्रक भरुन नाणी जमा झाली आहे. या नाण्यांच्या वजानामुळे छत कोसळण्याची भीती बँकेखालील व्यावसायीकांना वाटू लागली आहे. या नाण्यांवर प्रत्येक बँकेला आरबीआयला वर्षाकाठी 15 ते 20 लाखांचं व्याज द्यावं लागत आहे. शिवाय कापडी पिशव्यांचाही खर्च येतो. त्यामुळे अतिरिक्त नाणी आरबीआयने स्विकारावी अशी मागणी साई संस्थानच्या बँकांनी केली आहे.

साईबाबा चरणी मोठ्या प्रमाणात देणगी जमा होत आहे. तसेच दान स्वरुनपात पैशाच्या नोटांसोबत नाणीही जमा होत आहेत. शिर्डी साई संस्थानच्या बँकांतील ठेवींबरोबरच दानात आलेल्या नाण्यांचा बँकेकडील साठाही वाढतो आहे. नाण्यांच्या समस्येने शिर्डीतील अनेक राष्ट्रीयीकृत बँका मेटाकुटीला आल्या आहेत.  

शिर्डीतील साईसंस्थानची अनेक बँकांत खाती आहेत. यात 2500 कोटी पेक्षा जास्त ठेवी असल्याचे सांगण्यात येत आहे. साई संस्थान आठवड्यातून दोनदा देणगीची मोजदाद करते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बँकेला निमंत्रित करण्यात येते. दानातील नोटा आणि नाणी मोजून बँक घेऊन जाते. या रकमा बचत आणि ठेवीच्या रुपांत ठेवण्यात येतात. मात्र, आता नाणी जास्त झाल्याने ही नाणी ठेवायची कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे बँकाही चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.
 
प्रत्येक बँकेकडे नाणी साचल्याने जागा अपुरी पडत आहे. मात्र त्यावर संस्थानला तसेच रक्कम बँकेत रोखीने ठेवल्याबद्दल आरबीआयला व्याज द्यावे लागते. नाण्यांवर प्रत्येक बँकेला वर्षाकाठी पंधरा ते वीस लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे बँकेकडील अतिरिक्त नाणी आरबीआयने स्वीकारली आणि यातून तोडगा काढवा, अशी मागणी होत आहे. जवळपास आठवड्याला सात लाख रुपयाची नाणी जमा होतात. त्यानुसार एक वर्षाला साधारपणे 350 कोटी रुपये जमा होतात.

दरम्यान, शिर्डी साईबाबा मंदिरातील दानपेटीत जमा झालेली नाणी घेण्यास आठ राष्ट्रीयीकृत बँकांनी याआधी नकार दिला होता. बँकांनी सांगितले की इतकी नाणी ठेवायला जागा नाही. दानपेटीतून काढलेली सात लाखांची नाणी साई संस्थानकडे होती. ज्या बँकांनी नाणी घेण्यास नकार दिला आहे. ही समस्या सोडवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह इतर बँकांनाही पत्र लिहिले आहे होते. आता पुन्हा एकदा नाणी मोठ्याप्रमाणात जमा झाल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.