मुंबई : एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल होतोय. समोरच्या गाडीतील चालक हातात रिव्हॉल्व्हर दाखवतोय. गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्याचे इम्तियाज यांनी म्हटलंय. इम्तियाज यांनी यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना दखल घेण्यास सांगितलंय.
हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे ! वाहनवरील लोगो हे सर्व सांगते ! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का! @AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra https://t.co/SaWy3UVuH6
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) January 29, 2021
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. टोल नाक्यावर ट्राफीकमधून लेन कटींग करत कार चालक दुसऱ्या लेनमध्ये घुसत आहे. मात्र हा कार चालक आणि सहप्रवासी एका ट्रक चालकाला बंदुकीचा धाक दाखवत दादागीरी करताना दिसतायत.
हा व्हिडिओ एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला आहे. व्हिडिओत गाडी मागचा लोगो शिवसेनेचा असल्याचंही त्यांनी लिहिलं आहे. या ट्विटमधून जलील यांनी गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे कारवाईची मागणी केली आहे.
औरंगाबादेत आज खासदार इम्तियाज जलील हे 100 कोटींच्या घोटाळाचा पर्दाफाश करणार आहेत महापालिका, राज्य सरकार, वक्फ बोर्ड असे सगळे या घोटाळ्यात सहभागी असल्याचा जलील यांचे म्हणणे आहे आणि त्यासाठीच आज ते पत्रकार परिषद घेत खुलासा करणार आहेत.