एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला

Shiv Sena Crisis : जे गेले त्यांचा विचार करु नका, ताकदीनं लढा, असा कानमंत्र मुंबईतील विभागप्रमुखांना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे.  

Updated: Jun 24, 2022, 08:10 AM IST
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला title=

मुंबई : Shiv Sena Crisis : जे गेले त्यांचा विचार करु नका, ताकदीनं लढा, असा कानमंत्र मुंबईतील विभागप्रमुखांना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. आज राज्यातील जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांची बैठक मातोश्रीवर होत आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. ( Maharashtra Political Crisis) उद्धव ठाकरे यांनी आपला मुक्काम वर्षावरुन पुन्हा मातोश्रीवर हलवल्यानंतर शिवसैनीक मातोश्रीवर येत आहेत. दरम्यान काल रात्री मातोश्रीबाहेर आलेल्या शिवसैनिकांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली आणि भर पावसात त्यांच्यासोबत चर्चा केली. 

शिवसेनेच्या राज्यातील जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुखांची आज मुंबईत बैठक होत आहे. काही मोजके अपवाद वगळता संपूर्ण संघटना उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. बहुतेक जिल्हाप्रमुख आजच्या बैठकीला हजर राहणार आहेत. तर ठाण्यातील तीन जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे. अजून निरोप आला नसल्याचं ठाण्यातील जिल्हाप्रमुखांचं स्पष्टीकरण आहे.

रायगडमधील चार पैकी एका जिल्हाप्रमुखांने दांडी मारली आहे. तर धुळ्यातील आमदार मंजुळा गावित यांचे पती जिल्हाप्रमुख तुळशीराम गावितही बैठकीला दांडी मारणार असल्याचे समजते.