कल्याण : Shiv Sena Kalyan female aggressor :नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्य मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. मुंबईनंतर आता कल्याणमध्ये शिवसेना शहर शाखे बाहेर महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांनी राणा दापत्यच्या पोस्टरला जोडे मारत हे आंदोलन केले आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शाखे समोर आमदार राणा दाम्पत्याच्या प्रतिमेला चपलेने मारुन आपला निषेध व्यक्त केला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शाखे समोर आमदार राणा दाम्पत्याच्या प्रतिमेला जोडे मारलेत.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असून हिंमत असेल तर अडवून दाखवा, असे आव्हान दिल्यानंतर शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद सुरु झाला आहे. राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने शिवसैनिकांनी मुंबईत राणा दाम्पत्याच्या घरच्या परिसरात पहारा देत घोषणा बाजी सुरू केली. तर मातोश्री बाहेर देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक पहारा देत आहेत. आज कल्याणातुन शेकडो शिवसैनिक मातोश्रीच्या दिशेने सकाळीच रवाना झालेत. मुबईकडे जाण्यापूर्वी शिवसेना महिला कार्यकर्त्यानी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राणा दाम्पत्याच्या प्रतिमेला चपलेने मारत निषेध व्यक्त केला.
कल्याणमध्ये शिवसेना शहर शाखेबाहेर महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांनी राणा दापत्यच्या पोस्टरला जोडे मारत हे आंदोलन केले आहे. #ShivSena #Matoshri @ShivSena #NavneetRana #RaviRana #HanumanChalisa pic.twitter.com/DIX3PYItGR
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 23, 2022
शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मुंबईला निघाले आहेत, अशी माहिती शिवसेना महिला जिल्हा संघटक विजया पोटे, माजी नगरसेविका छाया वाघमारे यांनी दिली.