कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे (Eknath Shinde) शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडली. अनेक मातब्बर नेत्यांनी शिवसेनची साथ सोडली. तेव्हापासून ठाकरे पितापुत्रांनी पक्षाला नवसंजीवणी देण्यासाठी बैठकींचा आणि दौऱ्यांचा सपाटा लावलाय. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सातत्याने सर्वसामांन्यांची भेट घेतायेत. तसेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेच्या (Shiv Sanwad Yatra) माध्यमातून जनतेला संबाधित करतायेत. आतापर्यंत आदित्य यांनी शिव संवाद यात्रेचे 2 टप्पे पूर्ण केले आहेत. (shiv sena mla and yuva sena chief aditya thackeray 3 stage of shiv sanvad yatra in north maharashtra will 9 and 10 august)
आता आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेचा तिसऱ्या टप्प्याला 9 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. आदित्य आता तिसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एकूण 2 दिवसांचा हा उत्तर महाराष्ट्र दौरा असणार आहे. आदित्य यावेळेस बंडखोरी केलेल्या माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातही जाणार आहेत.
आदित्य 9 आणि 10 ऑगस्टला जळगाव, पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे, मालेगाव, नाशिक, सिन्नर आणि भिवंडी ग्रामीणमध्ये शिव संवाद यात्रा काढणार आहेत.
पहिला दिवस 9 ऑगस्ट 2022
सकाळी 11.30 वाजता - पाचोराऱ्यात शिव संवाद यात्रा
दुपारी 1.45 वाजता - धरणगाव (जळगाव ग्रामीण) शिव संवाद यात्रा
दुपारी 03.00 वाजता - पारोळा (एरंडोल) येथे शिव संवाद यात्रा
संध्याकाळी 04.30 वाजता - धुळ्यात स्वागत
संध्याकाळी 06.00 वाजता - मालेगाव येथे शिव संवाद यात्रा
दुपारी 12.30 वाजता - सिन्नर येथे शिव संवाद
संध्याकाळी 4.15 वाजता - आंबाडी (भिवंडी ग्रामीण) येथे संवाद