नारायण राणेंवर खासदार विनायक राऊत यांच्याकडून तिखट शब्दात प्रहार

विनायक राऊत यांच्या या वक्तव्यामुळे या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगणार आहे.

Updated: Sep 19, 2019, 06:40 PM IST

रत्नागिरी : नारायण राणे हे जे बुजगावणं आहे ते बुजगावणंच ठरलं आहे. दोन्हीं घरचा पाहुणा उपाशी याप्रमाणे ते मध्येच लटकले असल्याची खरमरीत टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे, मुख्यमंत्र्यांनी नाणारबद्दल केलेलं विधान अत्यंत दुर्देवी असल्याचं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे. 

यावरून भाजपात नारायण राणेंना प्रवेश दिला तर त्याचा विरोध होवू शकतो हे स्पष्ट झालं आहे. नारायण राणे आणि विनायक राऊत हे राजकीय विरोधक आहेत. विनायक राऊत यांच्या या वक्तव्यामुळे या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगणार आहे. तर दुसरीकडे विनायक राऊत यांनी देखील नारायण राणे यांना विरोध केला आहे.

शिवसेनेचा राणेंच्या भाजपा प्रवेशाला तीव्र विरोध असल्याचे शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाने नितेश राणे यांना कणकवलीतून उमेदवारी दिली तर शिवसेना आपला उमेदवार उभा करेल आणि त्यांचा पराभव करेल असेही ते म्हणाले. राणेंना काल व्यासपीठावर घेतलं नाही याचा अर्थ भाजपा त्यांना प्रवेश इच्छूक नाही हे स्पष्ट असल्याचे ते म्हणाले.