EXCLUSIVE व्हिडिओ : शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यातील दृश्यं

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 345 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा होत आहे. 

Updated: Jun 6, 2018, 10:41 AM IST

रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४५ वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने ता सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय. किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय. यावेळी छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आलाय. मुद्राभिषेक आणि पुष्पाभिषेकादरम्यान शहाजीराजेंनीही उपस्थिती लावली. लाखो शिवभक्तांच्या साक्षीने सोहळा पार पडतोय. 

यासाठी केवळ राज्यातूनच नाही तर देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. किल्ले रायगडावरील वातावरण शिवमय झालं आहे... ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.राजसदरेवरील शिवाजी महाराजांचा पुतळा असलेली मेघडंबरी फुलांनी सजवण्यात आली आहे. ढोलताशांचा गजर सुरू  आहे आज पहाटे ध्वजपूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात पालखी मिरवणूक निघणार आहे.

सकाळी १० वाजता रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळ्याला झालीय. संभाजीराजे यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर राजसदरेवरून पालखीचे शिवसमाधीकडे प्रस्थान होईल तेथे समाधी दर्शनानंतर या दिमाखदार सोहळ्याची सांगता होईल.