कल्याण : कल्याणातील शिवदुर्ग प्रतिष्ठान या ढोल-ताशा पथकाने दुर्गाडी गणेश घाटावर स्वच्छता मोहीम राबवत आपली सामाजिक जबाबदारी आणि भान जपलंय.
दरवर्षी गणेशोत्सवानंतर इतर विसर्जन स्थळांप्रमाणे कल्याणच्या गणेशघाटाची अवस्था बघवली जात नाही. नेमकी हीच बाब हेरून शिवदुर्गने याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत हा परिसर चकाचक करून टाकला.
गणेशोत्सवातील विसर्जनादरम्यान गणेशघाटाला अक्षरशः अवकळा प्राप्त झालेली असते. जागोजागी विखुरलेले थर्माकोलचे तुकडे, निर्माल्य आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा ढीग साचलेला असतो.
गेल्या ५ वर्षांपासून ढोल-ताशाच्या सरावासाठी गणेश घाटावर येणाऱ्या शिवदुर्ग प्रतिष्ठानला ही बाब खटकली आणि त्यातूनच मग याठिकाणी आम्ही ही स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याचे प्रतिष्ठान च्या वतीने सांगण्यात आले..