Shivena Symbol To Eknath Shinde: शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी जल्लोष

Maharashtra Politics Shinde Gat Celebrations: शिंदे गटाकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येतो आहे. अनेक ठिकाणी पेठे वाटत तर ढोल-ताश्यांसहित वाजंत्रीसोबत शिंदे गटानं जल्लोष स्वागत (Shinde Group Celebration After EC Announcement) केले आहे. 

Updated: Feb 17, 2023, 09:58 PM IST
Shivena Symbol To Eknath Shinde: शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी जल्लोष title=

Maharashtra Politics Shinde Gat Celebrations: महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा निर्णय आज लागला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदेच्या (Shivsena name and Symbol Goes to Eknath Shide) गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले असल्याचे निवडणूक आयोगानं सांगितले आहे. यावर आता राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात चर्चा आणि टीकांना सुरूवात झाली आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षाला आता कुठे पूर्णविराम मिळाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. गेल्या 7 महिन्यांचा हा सत्तासंघर्ष (Sattasangharsh in Maharashtra) आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची बाळासाहेबांची शिवसेना असे दोन गट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात हा सत्तासंघर्ष सुरू झाला आहेत. आता एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाले आहे. 

 

आत्तापर्यंत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मनसेचे राज ठाकरे (Raj Thackeray), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाकडे धनुष्यबाण गेल्यानंतर मुंबई, पुणे, ठाण्यात आणि ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिंदे समर्थकांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर रस्त्यावरुन उतरून एकच जल्लोष केला. आजच्या दिवस हा शिदें गटासाठी आनंदाचा ठरला आहे. गेल्या इतक्या महिन्यापासून शिवसेना कोणाची या प्रश्नाच उत्तर आज निवडणूक आयोगाने दिलं आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आता शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यामुळे शिंदे समर्थकांनी शिवसेना ही खऱ्या नेत्याचा हातात गेली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनाही या जल्लोष साजरा केला आहे. 

अनेक ठिकाणी पेठे वाटत तर ढोल-ताश्यांसहित वाजंत्रीसोबत शिंदे गटानं जल्लोष स्वागत (Shinde Group Celebration After EC Announcement) केले आहे. 

धुळ्यात जल्लोष : 

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना बाळासाहेब गटाने धुळे शहरामध्ये जल्लोष केला. सत्याचा विजय झाल्याचा दावा या वेळेस आनंदोत्सव साजरा करणारे शिवसैनिकांनी केला. शहरातील जुना महानगरपालिकेसमोर अतिशबाजी बाजी करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी नृत्य करीत जल्लोष केला. बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत . त्यामुळे आयोगाने दिलेला निर्णयाचे स्वागत करत असल्याचं शिवसैनिकांनी यावेळी सांगितलं. येणारा काळ हा शिवसेनेचाच असेल असा दावाही यावेळी करण्यात आला. आपसातले सर्व मतभेद विसरत शिवसेना बाळासाहेब गटाचे सर्वच नेते एकत्र आले होते आणि त्यांनी एकत्र येत जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

वाशिम जिल्ह्यात जल्लोष :

शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते, आज निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नाव हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्याने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, शिरपूर येथे शिंदे गट समर्थकांनी फटाके फोडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करीत जल्लोष साजरा केला आहे.मात्र आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. 

पुण्यात जल्लोष : 

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने आज पुण्यातील शिवसेनेच्या वतीने सारसबाग चौकामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे अजय भोसले रमेश कोंडे शर्मिला येवले इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने चौकात उपस्थित होते. फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला. 

सागंलीत जल्लोष : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धनुषबान हे चिन्ह मिळाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात शिवसैनिकांनी जलोष केला. गळ्यात धनुषबान चिन्ह असलेले मफलर घालून जलोश करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. 

नांदगावमध्ये जल्लोष : 

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह धनुष्यबाण निर्णय जाहीर करताच नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयासमोर एकच जल्लोष करण्यात आला. शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवत, फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

चेंबूरमध्ये जल्लोष : 

निवडणूक आयोहाने आज संध्याकाळी ठाकरे गटाला धक्का लागेल असा निर्णय दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह डोक्याचा निर्णय दिला आणि मुंबईत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये  आनंद संचारला चेंबूर टिळकनगर मध्ये शिंदे गटाला चिन्ह आणि पक्षाच नाव मिळाल्याबद्दल शिवसैनिकांनी जल्लोष केला  एकमेकांना पेढे भरवले तसेच  जल्लोष ढोल ताशे वाजवत  फटाक्यांची आतिषबाजी, केली महिला शिवसैनिकांनी नाचत आनंद व्यक्त केला.