सागर कुलकर्णी, झी मीडिया: सध्या संतोष बांगर (Santosh Bangar Controversy) यांच्या शिवीगाळ प्रकरणावरून सगळीकडेच वातावरण (Political Update) पेटलं आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण (Maharashtra Politics) तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सध्या अशीच एक टीका शरद कोळी (Sharad Koli) यांनी बांगर आणि गुलाबराव पाटील यांच्यावर केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल सभा होती. मी कुठलाही जातीवादी भाषण केले नाही, तरीही माझ्यावर बंदी घालण्यात आली आहे. आमदार बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केले, त्यांचे अनेक आमदार तलवार काढण्याची भाषा करतात, अनेकांना मारहाण देखील झाली तेंव्हा त्यावेळेस सुव्यस्था कुठे गेली होती. (Shivsena thackeray gat criticize minister gulabrao patil political news in marathi)
हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक
मी कोळी आहे, बहुजनांचा आहे म्हणून या सरकारला दुखावत नाही. म्हणून मला बंदी घालण्याचा प्रयत्न होतोय. कायद्याचे गैरवापर करून बांगर थय थय नाचत आहेत. दम असेल तर आमदार बांगर यांना राज्यातून तडीपार करा. सरकार त्यांचे आहे म्हणून बेकायदेशीर काम करण्याचे लायसन्स यांना दिले आहे का?, असा प्रश्न शरद कोळी यांनी उपस्थित केला आहे. गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचा धसका घेतला आहे. पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून खोटे गुन्हे दाखल करत आहेत. मात्र आम्ही भीक घालणार नाही, अशी टीकाही त्यांनी गुलाबराव पाटीलांवर केली.
हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक
बांगर नेहमी वादात असतात, मारहाण करतात. त्याचे सगळे धंदे पोलीसांना माहीत आहेत. भारतीय जनता पार्टी यांना कसं सहन करतात? संघ, फडणवीसही त्यांना कसं सहन करतात. पूर्वी कट्टर शिवसैनिक होता परंतु आता तो नाही, अशी खळबळजनक टीका चंद्रशेखर खैरे (Chadrashakher Khaire) यांनी केली आहे. नवनवीन राणा 5 ते 6 दिवस कुठे होत्या? बचू कडू बोलत होता तेव्हा गायब होत्या. वाद मिटला आणि आता समोर आल्या आहेत. अब्दुल सत्तार खोड्या करणारा माणूस आहे. 17 पक्ष फिरून आलाय. सरड्या सारखा रंग बदलतो. त्यांनी मुंबईत एकाच वेळी सभा ठेवून हास्य करून घेतलं. तो माणूस पैसे गोळा करून माणसं आणेल मात्र आमची सभा यशस्वी होईल. सध्या सगळीकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे सध्या टीकास्त्रांचं वारं सुरू झालं आहे.