'मी पळालो नाही, पुणे पोलिसांनी पळवलं' ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा धक्कादायक दावा

Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलने धक्कादायक दावा केला आहे. ललित पाटीलला बंगळुरुमधून अटक करण्यात आली, यानंतर त्याला आज कोर्टात हजर केलं असताना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी ललिल पाटलीने आपल्यावलचे सर्व आरोप फेटाळले आहेत. 

सागर आव्हाड | Updated: Oct 18, 2023, 01:10 PM IST
'मी पळालो नाही, पुणे पोलिसांनी पळवलं' ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा धक्कादायक दावा title=

Drugs Mafia Lalit Patil :  ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil)अखेर बंगळुरुतून अटक करण्यात आलीये.  मुंबई पोलीस (Mumbai Police) त्याला मुंबईत घेऊन आले. वैद्यकीय तपासणीनतंर त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं असून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्या आली आहे. 2 ऑक्टोबर 2023ला ललित पाटील पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून (Sasoon Hospital) पळून गेला होता. तेव्हापासून त्याचा कसून शोध घेतला जात होता. याचप्रकरणात पुणे पोलिसांनी आधी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला उत्तर प्रदेशातून अटक केली होती. आता ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्यायत.  ललित पाटील पुण्यातून, गुजरात, त्यानंतर कर्नाटकला गेला. कर्नाटकातून तो गुजरातला गेला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून ललित पाटीलची माहिती माहिती मिळाली. 

ललित पाटली यांनी धक्कादायक दावा केला आहे. मी पळालो नाही तर मला पोलिसांनी पळवलं, असं ललित पाटील याने म्टलं आहे. यामागे कुणाकुणाचे हात आहे, हे सर्व मी सांगेन मी पत्रकारांशी सगळं बोलेने असं ललित पाटील याने म्हटलंय. पोलिसांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचंही ललित पाटील याने म्हटलं आहे. 

भारताबाहेर जाण्याच्या तयारीत
ललित पाटील हा भारताबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता अशी धक्कादायक माहिती समोर येतेय...भारताबाहेर पळून जाण्यासाठी ललित कोलकाता, राजस्थान, बंगळुरुमध्ये गेला होता. मात्र, भारताबाहेर पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. गेल्या 15 दिवसात ललितला पळून जायला कोण मदत करत होतं...? ललितला राजकीय मदत मिळाली होती का? याबाबतही तपास सुरू आहे.

विरोधकांचा गंभीर आरोप
दरम्यान याप्रकरणी मंत्री दादा भुसे आणि शंभुराज देसाई यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलीय. तर सीआयडी चौकशी करावी असं काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय.  ललित पाटीलची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राहित पवारांनी केलीये. त्याच्या CIDचौकशीलाही त्यांनी विरोध केलाय.

कोण आहे ललित पाटील?
ललित पाटील हा ड्रग्ज तस्करीमधला मोठा डिलर आहे. एमडी ड्रग्ज हे हायप्रोफाईल लोकांना तो विकायचा यातून करोडो रुपये त्याने कमावले. नाशिकमध्ये नामांकित राजकीय पक्षाची ललित पाटीलला साथ होती असं बोललं जातं. ललितने नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली, पण निवडणूकीत त्याचा पराभव झाला. काळ्या पैशातून राजकीय बस्तान बसवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.