धक्कादायक ! शासकीय रुग्णालयातून कोरोना लसीची चोरी?

 शासकीय रुग्णालयातून आता कोरोना लस गायबही होऊ लागल्या आहेत.

Updated: Feb 17, 2021, 02:57 PM IST
धक्कादायक ! शासकीय रुग्णालयातून कोरोना लसीची चोरी? title=

अकोला : देशभरात सध्या लसीकरणाची मोहिम राबवली जात असताना शासकीय रुग्णालयातून आता कोरोना लस गायबही होऊ लागल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार अकोल्यातल्या चतरी शासकीय रुग्णालयात घडला आहे. इथल्या 7 लस गायब झाल्या आहेत. या रुग्णालयात 450 डोस प्राप्त झाले होते. लस देऊन झाल्यानंतर ४४ लस शिल्लक राहणं अपेक्षित असताना केवळ ३७ लसच उर्वरित राहिल्या आहेत. त्यामुळे ७ लस गहाळ झाल्याचं उघडकीस आलं. 

या संबंधी पोलिसात तक्रार देणं अपेक्षित असतांना ५ दिवस उशिरा चानन्नी पोलिसात आज तक्रार देण्यात आली. उशिरा देण्यात आलेल्या तक्रारी मूळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे आहे. 

मुंबईसह राज्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. 16 जानेवारीला लसीचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना आता दुसरा डोस दिला जात आहे. आतापर्यंत लाखो व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली आहे. सरकार लवकरच खाजगी रुग्णालयांना देखील लसीकरणाची परवानगी देणार आहे.