अल्पवयीन मुलाकडून मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवत धक्कादायक मागणी

गंभीर गुन्हात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेची बाब 

Updated: Jul 5, 2021, 11:23 AM IST
अल्पवयीन मुलाकडून मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवत धक्कादायक मागणी  title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात गंभीर गुन्हात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेची बाब समोर आली आहे. आता नागपुरात अल्पवयीन गुन्हेगारांनं केलेली धक्कादायक गुन्हा समोर आलाय. एका 14 वर्षाच्या मुलाने 12 वर्षीय मुलीच्या गळ्यावर चाकू ठेऊन धक्कादायक मागणी केली आहे. ( Shocking, demand, minor boy, holding, knife, girls neck)

14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने 12 वर्षांच्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून खंडणीची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलाने 50 लाखांची खंडणी केली आहे. तसेच आई, वडिलांची व भावाची हत्या करेन अशी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद जब्बार यांचे नागपूरच्या गंगाबाई घाट जवळ वाहनांच्या स्पेयर पार्टचे मोठे दुकान आहे तर सिद्धार्थ नगर भागात त्यांचे आलिशान घर आहे.

काही दिवसांपूर्वीपर्यंत आरोपी असलेला 14 वर्षीय मुलगा जब्बार यांच्या घरी पाळीव कबुतरांना दाणे टाकण्याचे काम करायचा. त्यामुळे त्याला जब्बार यांच्या चांगल्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. याचाच फायदा घेत काही दिवसांपूर्वी 14 वर्षीय आरोपी मुलाने त्याच्या दोन साथीदारांसह जब्बार यांची बारा वर्षे मुलगी मेहंदी क्लासला जात असताना तिच्या गळ्यावर चाकू लावून अडविले. तिघांनी तिचे हात दोरीने बांधत तिला निर्जन ठिकाणी नेले. आणि तुझ्या घरातून 50 लाख रुपये आणून दे, अशी मागणी केली.

तुझ्या आई, वडील आणि भावाला जिवानिशी मारू अशी धमकी तरूणीला देण्यात आलं. मुलगी या घटनेने पुरती घाबरली, त्यामुळे ती आपल्या घरातून काही रक्कम आपल्याला आणून देईल अशी खात्री पटल्यानंतर तिन्ही आरोपींना त्या मुलीला सोडून दिले. मुलगी घरी परतल्यानंतर खूप घाबरलेली होती. आईवडिलांच्या प्रेमापोटी आणि भीतीपोटी दोन दिवस तिने कोणालाच काहीच सांगितले नाही. मुलीची अवस्था पाहून जब्बार कुटुंबियांनी तिची विश्वासाने विचारपूस केली असता, तिने सर्व घटना आई वडिलांना सांगितली.

घटनेचे गांभीर्य ओळखून जब्बार कुटुंबियानी नागपूरच्या पाचपावली पोलिस स्टेशनमध्ये खंडणी संदर्भातली तक्रार दिली.  त्यानंतर पोलिसांनी मुलीने सांगितलेल्या प्रमाणे एका 20 वर्षीय गुन्हेगारास सह 14 वर्षीय मुख्य आरोपी मुलगा आणि आणखी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.