नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार; वाहनचालकांचा जीव धोक्यात

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याला कारण आहे ते नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग करण्यात असललेली बेकायदा पार्किंग. 

वनिता कांबळे | Updated: Jun 10, 2024, 08:38 PM IST
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार; वाहनचालकांचा जीव धोक्यात title=

Nagpur Mumbai Samruddhi Expressway : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच, एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर ते डोणगाव दरम्यान, ट्रक आणि ट्रेलर सारखी अवजड वाहनं बेकायदेशीरपणे उभी केली जातात. नागपूर आणि मुंबई अशा दोन्ही कॉरिडॉरवर चक्क 3 लेनच्या बाजूला, आपत्कालीन लेनवर अवजड वाहनं अनधिकृतपणे उभी केली जातात.

विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीतच ही लेन वापरली पाहिजे असा नियम आहे. मात्र इथे सर्रास ट्रकच्या रांगाच दिसून येतात. यामुळे ताशी 120 किलोमीटर वेगमर्यादा असलेल्या समृद्धी महामार्गावर अपघात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रशासनानं याकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. 

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणारा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी केले होते. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी फक्त पाच तासातच कापणे शक्य झाले आहे.

सोमाटणे टोल नाक्यावर होत असलेल्या टोलवसूलीवरून स्थानिक नागरिक संतप्त

सोमाटणे टोल नाक्यावर होत असलेल्या टोलवसूलीवरून स्थानिक नागरिक संतप्त झालेत. स्थानिकांना टोलमधून सवलत मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं मात्र असं असताना टोल प्रशासन स्थानिकांकडून टोलची आकारणी करतंय. यामुळे नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त केल्या जातायत. कारला फास्टॅग नसल्याने टोल कर्मचारी कारच्या क्रमांकावरून टोलचे पैसे प्रवाशांच्या बँक खात्यातून कापून घेतायत.. याचा जाब विचारल्यावर मेल करा. त्यानंतर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील असं सांगण्यात येतंय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी हा टोल बेकायदेशीर असून तो बंद झाला पाहिजे अशी मागणी केलीय.