Covdi-19मुळे नाही तर महाराष्ट्रात 'या' आजारामुळे मृतांच्या संख्येत वाढ

कोविडचा असा ही परिणाम 

Updated: Dec 25, 2020, 01:43 PM IST
Covdi-19मुळे नाही तर महाराष्ट्रात 'या' आजारामुळे मृतांच्या संख्येत वाढ  title=

मुंबई : महाराष्ट्रात (Maharaashtra) हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) याच्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालयात झाली आहे. डॉक्टरांच म्हणणं आहे की, याचं सर्वात महत्वाचं आणि मोठ कारण आहे 'कोरोनाचा फोबिया' (Corona Fobia). 

अनेक नागरिक कोविडच्या टेस्टपासून वाचण्यासाठी रुग्णालयात जाणं टाळत आहेत. त्यामुळे तब्बेत अधिक बिघडल्यावर रस्त्यात मृत्यू होतो किंवा मृत नागरिकांना रुग्णालयात आणलं जात आहे. तर ९०% हृदय विकाराचा आजार असणारे रुग्ण डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. 

हार्ट अटॅक आणि हृदयविकाराशी संबंधीत कारणामुळे मृतांचा आकडा वाढत असल्याचे दोन महिन्यात आढळून आले आहे. सरकारी आकडा येण्यास थोडा वेळ लागेल मात्र अनेक रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. 

याचं महत्वाचं कारण कोरोना. कोरोनाच्या भीतिमुळे नागरिक रुग्णालयात जाणं टाळत आहे. तसेच श्वसनाच्या त्रासाला कोविडशी जोडून डॉक्टरांचा सल्ला घेऊन चुकीची औषधे खात आहेत. मसीना हार्ट इंस्टिट्यूट, एसएल रहेजा आणि के.जे सोमैया सूपरस्पेशीऐलिटीशी संबंधित कार्डियोलोजिस्ट डॉ नितिन बोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात हार्ट अटॅकने लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण १० ते २० टक्क्यांनी वाढले आहे. 

फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल वाशीचे इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. ब्रजेश कुंवर यांच्या माहितीनुसार एका महिन्यात जवळपास १५ रुग्ण असे आहेत ज्यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. डॉक्टरांचे ९० टक्के हृदयाशी संबंधित आजार असलेले रुग्ण फॉलोअपलाच येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.