वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले

वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले

Updated: Oct 21, 2022, 05:58 PM IST
वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर  : ऐन दिवाळीच्या तोंडावर एक दुर्देवी घटना घडली आहे. बलापूर जवळील कोंडेश्वर कुंडात (Badlapur Kondeshwar) बुडून चार तरुणांचा मृत्यू झाला. वाढदिवसांचं सेलिब्रेशन करण्यासाठी हे चारही तरुण मुंबईतल्या उपनगरातून इथं आले होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

मुंबई उपनगरातील घाटकोपर (Ghatkopar) भागातून चार मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात आले होते. पोहण्यासाठी हे चारही मित्र कुंडातील पाण्यात उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याचने चारही जण बुडाले. स्थानिक गावकऱ्यांना माहिती मिळताच गावकऱ्यांनी कुंडातील पाण्यात उड्यात घेत चारही तरुणांना बाहेर काढलं. पण त्याआधीच त्या चारही जणांचा मृत्यू झाला होता. 

पावसाळ्यात कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी मनाई आदेश लागू होते. मात्र तरी देखील हे मनाई आदेश न जुमानता अनेक तरुण या ठिकाणी सहलीसाठी येतात. स्थानिक गावकरी वारंवार त्यांना विरोध करत असताना देखील या तरुणांनी कुंडाच्या पाण्यात उतरून आपला जीव धोक्यात घातला. सध्या या तरुणांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र एन दिवाळीत या मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे